नवी दिल्ली : आपचे मंत्री संदीप कुमार यांची अक्षेपार्ह सीडी सापडल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे सेक्स स्कँडल उघकीस आल्यानंतर अरवींद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. दरम्यान, आपल्याला यात अडकविल्याचे असल्याचे कुमार यांनी म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संदीप कुमार यांच्याकडे बालकल्याण आणि सामाजिक न्याय ही खाती होती. केजरीवालांच्या मंत्रिमंडळातील तिस-या क्रमांकाचे मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. 2015मध्ये झालेल्या निवडणुकीत ते आमदार म्हणून निवडून आले होते. या सर्व प्रकरणावर केजरीवाल मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. 


संदीप कुमार यांच्याशी संबंधित एक आक्षेपार्ह सिडी सापडल्यानंतर अर्धा तासांच्या आतच त्यांची हकालपट्टी केल्याचं शिसोदिया म्हणालेत. मात्र, मी दलित असल्याने माझ्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले, त्याची शिक्षा मला मिळत आहे. अश्‍लील सीडीमध्ये मी नसून याची चौकशी करण्यात यावी, असे हकालपट्टी करण्यात आलेले दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांनी म्हटले आहे.