योगी आदित्यनाथांच्या कॅबिनेट बैठकीवर अवघ्या महाराष्ट्राच लक्ष
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटची पहिलीवाहिली मीटिंग अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटची पहिलीवाहिली मीटिंग अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कारण, यूपीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन यूपीत आदित्यनाथ यांनी दिलं होतं, ते पहिल्याच बैठकीत आश्वासन पूर्ण करणार का? आणि यूपीत कर्जमाफी झाल्यास त्यावरुन महाराष्ट्रात आधीच कर्जमाफीची मागणी होतेय, तर यावर काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी ३० हजार कोटींची गरज आहे, असं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर उत्तर प्रदेशातल्या जवळपास २ कोटी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायची झाल्यास ६२ हजार कोटींची गरज आहे. शिवाय केंद्र सरकार यात केवळ उत्तर प्रदेशसाठी कुठली वेगळी मदत देणार नाही. त्यामुळे केंद्राच्या मदतीविना हे आव्हान योगी सरकार कसं पेलणार? कर्जमाफी पूर्णपणे माफ करणार का हे आजच्या योगींच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कळणार आहे.
उयूपीच्या प्रचारात स्वत: पंतप्रधान मोदी यांनी भाजपचं सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये यूपीच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा केली होती. त्तर प्रदेशमध्ये नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर जवळपास २ आठवड्यांनी ही कॅबिनेटची मीटिंग होत आहे.