वडोदरा : वडोदऱ्यामध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.