नवी दिल्ली :  सोन्याची तस्करी ही भारतासाठी नवीन नाही आहे, पण नोटबंदीनंत काळा पैसा रिचवण्यासाठी लोकांनी सोने खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यामुळे काळ्या पैशाच्या ठिकाणांवर छापेमारीत मोठ्या प्रमाणात सोने सापडत आहे. दिल्ली एअरपोर्टवर एका दाम्पत्याकडे १६ किलो सोने सापडले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाम्पत्याने सोने आणण्याचा जो प्रकार केला तो ऐकल्यावर तुम्हांला विश्वास बसणार नाही. असाच काहीसा प्रकार अधिकाऱ्यांचा झाला. आरोपींनी लहान मुलाच्या बेबी डायपरमध्ये १६ किलो सोने लपवून आले.  अधिकाऱ्यांनी तपासणी केली ही बाब उघड झाली. आता त्यांची चौकशी सुरू आहे. 


या प्रकरणी दोन दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. एकूण चार जण यात आहे, त्यांच्यासोबत एक लहान मूलही होते. त्यांनी सोळा किलो सोने मुलाच्या डायपरमध्ये लपविले होते.  ते सर्व सूरतचे राहणारे आहेत.