नवी दिल्ली : नोटबंदीच्या काळामध्ये बँकेत दोन लाखांपेक्षा जास्त पैसे टाकणाऱ्यांची चौकशी होणार आहे. उत्पन्न आणि टाकलेल्या रकमेमध्ये फरक येत असेल तर ही चौकशी होणार असल्याचं वित्त सचिव हंसमुख अधिया यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीच्या काळामध्ये अनेकांनी बँकांमध्ये 20-20 अकाऊंट उघडली आणि त्यामध्ये 2.5-2.5 लाख रुपये टाकले. या सगळ्या अकाऊंट पॅन कार्डला जोडलेलं आहे. 8 नोव्हेंबरनंतर बँकांमध्ये जवळपास दोन तृतियांश रक्कम ही 2.5 लाख रुपये आणि त्यापेक्षा अधिक आहे, असंही अधिया म्हणालेत.


या काळामध्ये 1.09 कोटी अकाऊंटमध्ये 5.48 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. ही सगळी रक्कम 2 ते 80 लाख रुपयांच्या घरात आहे. तर 1.48 लाख अकाऊंटमध्ये 4.89 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले. पॅन कार्डच्या माध्यमातून ज्यांनी बँकांमध्ये दोन ते अडिच लाख रुपये टाकलेत त्यांची यादी सरकारनं तयार केली आहे. यामध्ये 18 लाख जणांचा समावेश आहे.