नवी दिल्ली :  एलईडी बल्बच्या धर्तीवर केंद्र सरकार आताा वीज वाचविणाऱ्या आणखी एका प्रकल्प हाती घेत आहे. सरकार आता एनर्जी एफिशिएंट एअरकंडीशनर (एसी) विकण्याच्या तयारीत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या एसीची किंमत थोडी जास्त असल्याने हा एसी हप्त्याने (EMI)विकले जाणार आहेत. वीज कंपन्यांसोबत ईईएसएलने सुमारे एक लाख एसी खरेदी केले आहेत. सध्या किंमत अधिक असल्याने या हे एसी सरकारी कार्यालय आणि एटीएममध्ये लावण्यात आले आहे. 


ईईएसएलच्या अंदाजानुसार पुढील डिलिव्हरीमध्ये या एसीच्या किंमती कमी होतील त्यामुळे सामन्य जनतेसाठी नंतर लॉन्च केला जाणार आहे. 


एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिस लिमिटेड ( ईईएसएल)चे प्रबंध निदेशक सौरभ कुमार यांच्या मते एनर्जी एफिशिएन्ट एसी बाजारात खूप कमी आहेत. जे फाइव्ह स्टार एसी बाजारात उपलब्ध आहेत, त्यांची रेटिंग ३.७ आहे, आम्हांला ही रेटिंग ५.३  हवी आहेत. असा एसी भारतीय बाजारात वाढायला पाहिजे, त्यामुळे सुमारे ४० टक्के वीज कमी खर्च होते.  सध्या अशा एसीची किंमत ५० हजार ते ६० हजार रुपये आहे. 


येत्या सप्टेंबरपर्यंत या एसीचा पुरवठा होणार आहे. जितके जास्त एसी कंपनी खरेदी करणार तितकी किंमत कमी असणार आहे. त्याचा फायदा सामन्य जनतेला होणार आहे.