नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध बिर्ला ग्रुपच्या मालकीच्या हिंदुस्तान मोटर्सची शानदार कार 'अॅम्बेसेडर' 80 करोड रुपयांना विकली गेलीय. फ्रेंच कार कंपनी पूजो (pegeot)नं 'अॅम्बेसेडर'चे हक्क खरेदी केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन वर्षांपूर्वी 2014 साली 'अॅम्बेसेडर' कारचं उत्पादन थांबवण्यात आलं होतं. एक दशकापूर्वी भारताच्या पंतप्रधानांपासून ते सामान्य ग्राहकांसाठी असलेल्या या कार मोठ्या मानाच्या समजल्या जायच्या. 


सी के बिर्ला ग्रुपच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्तान मोटर्सनं आपला ब्रॅन्ड आणि ट्रेडमार्क 'अॅम्बेसेडर'ला 80 करोड रुपयांना विकलंय. या व्यवहारानंतर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत रक्कम आणि इतर देणं देण्यात येईल.  


'अॅम्बेसेडर' ब्रॅन्डला सात दशकांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आलं होतं. त्यावेळी, हिंदुस्तान मोटर्सनं मॉरिस ऑक्सफर्ड सीरीज II (लँन्डमास्टर)ला काही बदलांसहीत नव्या अवतारात सादर केलं होतं. 1980 पर्यंत 'मारुती' बाजारात दाखल होईपर्यंत ही कार भारतीय बाजारातला हुकुमी एक्का ठरला होता. मागणी कमी झाल्यानंतर 24 मे 2014 रोजी हिंदुस्तान मोटर्सनं उत्तरपारा प्लान्टमधलं आपलं उत्पादन बंद केलं होतं.