नवी दिल्ली : दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांनी, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मी अधिक मोठा देशभक्त असल्याचे म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केजरीवाल यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र जेएनयूच्या खऱ्या देशद्रोह्यांना अटक करून भाजप, जम्मू काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी दुखवायचे नसल्याची, टीका केजरीवाल यांनी केली.


जेएनयूमध्ये देशद्रोही घोषणा देणारे हे काश्‍मिरी असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. 'या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्यास मुफ्तींना राग येईल, या भीतीने त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सीमारेषेवर आपले जवान रोज हुतात्मा होत आहेत आणि मोदी काश्‍मीरमध्ये सरकार स्थापन करावयाचे असल्याचे देशद्रोही घटकांना पाठिंबा देत आहेत,' असे केजरीवाल म्हणाले.


'माझ्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी दलित, गरीब आणि मागासलेल्या वर्गासाठी संघर्ष करत आहे, म्हणूनच मी भाजपसाठी देशद्रोही ठरलो आहे. मात्र माझा आवाज दडपता येणार नाही. मी त्यांच्यासाठी लढतच राहिन. मी मोदीजींपेक्षा मोठा देशभक्त आहे', असे केजरीवाल यांनी म्हटले.