हैदराबाद : हैदराबादमधील एका उबेर कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 7 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्यात. इतकी मोठी रक्कम आढळल्यानंतर आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयकर विभागाच्या माहितीनुसार, नोटाबंदीआधी या खात्याचा जास्त वापर केला जात नव्हता. नोटाबंदीनंतर केवळ काही आठवड्यांतच ही रक्कम जमा करण्यात आलीये. 


पंतप्रधान मोदींनी नोटाबंदी जाहीर केल्यानंतर ठिकठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले या छाप्यात मोठ्या प्रमाणात जुन्या नोटा तसेच नव्या नोटांचे साठे जप्त करण्यात आले.