आयकर खात्याने देशातून जप्त केला ४ हजार कोटींचा काळा पैसा
मोदी सरकारने केलेल्या नोट बंदीनंतर आयकर विभागाने आत्तापर्यंत कारवाईत पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा जप्त केला आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारने केलेल्या नोट बंदीनंतर आयकर विभागाने आत्तापर्यंत कारवाईत पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा जप्त केला आहे.
आयकर विभागाने ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर पर्यंत केलेल्या कारवायांची माहिती समोर आली आहे. आयकर विभागाच्या कारवायातून ४ हजार कोटी काळा पैसा जप्त करण्यात आला आहे. त्यात १०५ कोटी नवीन नोटा मिळाल्या आहेत...
धाडीत काय काय सापडले...
- ४ हजार १७२ कोटी काळा पैसा सापडला.
- ४५८ कोटी रोकड सापडली
- त्यापैकी १०५ कोटी किंमती च्या नव्या नोटा मिळाल्या.
- तर ९१ कोटी किंमतीचे ज्वेलरी मिळाली
- ९८३ धाडी टाकण्यात आल्या.
- ५०२७ नोटीस पाठवण्यात आल्या
- २५४ केसेस ईडी कडे पाठवल्या
- २२३ केसेस सीबीआयकडे पाठविल्या आहेत.