चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारताचे जोरदार प्रयत्न
अनावधानानं नियंत्रण रेषेपलिकडे गेलेला जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारतानं वेगवान प्रयत्न सुरू केलेते. आज भारताच्या लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत केलीय.
नवी दिल्ली : अनावधानानं नियंत्रण रेषेपलिकडे गेलेला जवान चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी भारतानं वेगवान प्रयत्न सुरू केलेते. आज भारताच्या लष्करी कारवाईचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी पाकिस्तानच्या महासंचालकांशी बातचीत केलीय.
चंदू चव्हाण हा मूळचा धुळे जिल्ह्यातला असून तो सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. भारतानं 29 सप्टेंबरला केलेल्या सर्जिकल हल्ल्याच्या दिवशी चंदू चव्हाण पूंछ सेक्टरमध्ये चूकून नियंत्रण रेषेच्या पलिकेडे गेला आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या हाती लागला.
ही बातमी कळल्यावर धुळ्यात त्याच्या आजींचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. तेव्हापासूनच त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सर्वोच्च स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.