नवी दिल्ली : रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी रेल्वेनं खूशखबर दिली आहे. तिकिटावरील सर्व्हिस चार्ज माफ केला आहे. दरम्यान, हा सर्व्हिस टॅक्स नसून सर्व्हिस चार्ज आहे. त्यामुळे कराच्या उत्पन्नातही फारशी घट होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून वगळण्यात आल्यानंतर अनेकांचे दैनंदिन व्यवहार करताना हाल झाले होते. रेल्वे काऊंटरवर तिकीट बुक करताना अनेकांना सुट्टे पैसे नसल्याकारणानं तिकीट बुक करता येत नव्हती. मात्र तिकीट बुकिंग करणाऱ्या ऑनलाइन ग्राहकांसाठी रेल्वेने ही सुविधा माफ केली.


IRCTC या वेबसाइटवरून ऑनलाइन रेल्वे तिकीट काढणाऱ्यांना सर्व्हिस चार्ज  माफ करण्यात आला आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर 2016पासून 31 डिसेंबरपर्यंत 2016पर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा सर्व्हिस चार्ज लागणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.



रेल्वेच्या स्लीपर कोचच्या बुकिंगसाठी 20 रुपये सर्व्हिस टॅक्स आकारण्यात येत होता. तर एसी कोचच्या बुकिंगला हाच टॅक्स 40 रुपयांपर्यंत द्यावा लागत होता. कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.