जम्मू : काश्मीरच सीमेलगत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्काराचे चार जवान शहीद झालेत. तर चार दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही चकमकीत मिळून ८ जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. काश्मीरच्या हंदवाड्यात जिल्ह्यात संध्याकाळी झालेल्या चकमकीत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पण या कारवाईत मेजर एस दहियांना गोळ्या लागल्या. त्यांना तातडीनं लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली. 


तिकडे हंदवाडा जिल्ह्यात झालेल्या गोळीबारात १० जवान जखमी झाले. त्यापैकी तीन जवान शहीद झाले. तर दहशतवाद्याला ठार मारण्यात आलंय. पण त्याची ओळख मात्र अद्याप पटलेली नाही.