नवी दिल्ली : मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पीडित मुलामुलींची स्वत: रिजिजु यांनी भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी रिजिजुंकडे कारवाईची मागणी केली होती. यावेळी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांची भेट घेतली तसंच रेल्वेत मराठी मुलांच्या भरतीसंदर्भात यावेळी त्यांच्याशी चर्चाही केली. झी 24 तासनं ही बातमी लावून धरल्यानंतर या मुलांना न्याय देण्याचे प्रयत्न सुरू झालेत.


रेल्वेअॅप्रेंटीसच्या मुलांना रेल्वेत समावून घेण्यासाठी आंदोलन करणा-या मराठी मुला- मुलींवर दिल्लीतील रेल्वे मंत्रालयासमोर लाठीचार्ज झाला होता. यात महाराष्ट्रातील अनेक मुले जखमी झाली होती. मराठी मंत्री म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे हे विद्यार्थी आले असता त्यांना काठ्या खाव्या लागल्या. महाराष्ट्रातील दीड हजार मुलानी आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर या सर्व मुला मुलींना संसद मार्ग पोलिस ठाण्यात डांबण्यात आले.