नवी दिल्ली: ऑगस्टा हेलिकॉप्टर डीलप्रकरणावरुन संसदेत पुन्हा गोंधळ झाला. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी युपीएवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसवर टीका करताना पर्रिकरांनी मराठी म्हणीचा दाखला दिला. 


जो आळूची भाजी खातो त्याचाच घसा खवखवतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जो आळूची भाजी खातो त्याचाच घसा खवखवतो, तुमचा घसा का खवखवत आहे, असा टोला पर्रिकरांनी मराठीमध्ये मारला. संसदेतल्या काही खासदरांनी आळूचा अर्थ बटाटा म्हणजेच आलू असा घेतला पण मराठी असलेल्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आळूचा हिंदीतला अर्थ खासदारांना सांगितला. 


यूपीएनं कोणतीच कारवाई केली नाही


डिसेंबर 2012 साली 3 हेलिकॉप्टर भारतात आले.. त्याचवेळी या भ्रष्टाचाराचा खुलासा झाला. मात्र यावेळी सत्तेत असलेल्या युपीए सरकारनं भ्रष्टाचार करणा-यांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पर्रिकर यांनी यावेळी केला.