केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंच्या गाडीला अपघात
केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो अपघातात जखमी
नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक आणि केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो शुक्रवारी एका अपघातात जखमी झाले. आपल्या मुलीला एयरपोर्टवर आणण्यासाठी जात असतांना हा अपघात झाला. सुप्रियो बुलेट बाइकने त्यांच्या मुलीला सरप्राइज देण्यासाठी जात होते पण ही दुर्दैवी घटना घडली.
संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी दिल्लीच्या मोतीबाग फ्लाईओवर एका कारने सुप्रियो यांच्या बाइकला ठोकर मारली. सुप्रियो यांना एम्स ट्रोमा दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.
सुप्रियो यांच्या गुडघ्याला आणि छातीला दुखापत झाली आहे. डोकं, छाती आणि पोट यांचं देखील सीटी स्कॅन रिपोर्ट सामान्य आहे. त्यांना २४ तासाच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे.
सुप्रियो पश्चिम बंगालच्या आसनसोल या मतदार संघातून खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये ते शहरी विकास राज्यमंत्री आहे. ते एक गायक देखील आहेत.