गांधीनगर : गुजरात येथे 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडीत बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.  उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळली आहे. १९ जानेवरी २००८ रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील 20 आरोपींपैकी 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने 12 दोषी आरोपींची जन्मठेप शिक्षा कायम ठेवली असून, यात 5 पोलिसांचा समावेश आहे. तर 1 आरोपींचा मृत्यू झाला आहे. मात्र, ज्या 7 जणांना मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष सोडलं होतं त्यापैकी 5 जणांना मुंबई उच्च न्यायालयाने दोषी ठरवलंय. त्यांना दुपारी 1 नंतर शिक्षा सुनावली जाणार आहे.


3 मार्च २००२ साली गुजरातच्या दाहोड जिल्ह्यातील राधनपूर गावात ही घटना घडली होती. जवळपास ३०-३५ समाजकंटकांच्या जमावाने बिल्कीस बानो आणि तिच्या कुटुंबियांवर हल्ला केला आणि त्या जमावाने बिल्कीस बानोच्या १४ कुटुंबीयांना मारले होते यामध्ये आई, दोन बहिणी, तीन वर्षांची मुलगी यांची हत्या करण्यात आली होती.