मोदींना २०१९ मध्येही जनता कौल देणार - अमेरिकन तज्ज्ञ
अमेरिकेतील तज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला.
नवी दिल्ली : अमेरिकेतील तज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला. या विजयासाठी नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या विजयामुळे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतही लोकांचा कौल मोदींनाच असेल.
भारतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा फार अतंर नाही. हे निकाल त्या निकालांसारख अविश्वसनीय आहेत. भाजप उमेदवार विरोधी उमेदवारापेक्षा फार मोठ्या फरकाने जिंकले आहेत.', असं मत अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयाचे सहाय्यक प्राध्यपक अॅडम जीगफेल्ड यांनी मांडलं आहे.
अमेरिकन इंटरप्राईज इन्स्टिट्यूटचे सदानंद धुमे म्हणतात, नरेंद्र मोदीच २०१९ मध्येही लोकांची पहिली पसंत असतील. मोदी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्याचं या विजयावरुन दिसतं.
भाजपला २०१९ मध्ये बहुमत मिळणार नाही, पण युती करुन भाजप सत्तेत येईल. भाजपने या राज्यांमध्ये अतिशय विचारपूर्वक प्रचार केला आहे. पण २०१९ मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांना एकजूट व्हावं लागेल, असं मत प्राध्यापक इरफान नूरुद्दीन यांनी व्यक्त केलं.
निवडणुकीच्या आधी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय लोकांना अतिशय आवडला. अडचणी येऊनही लोकांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचं समर्थन केलं. या विजयानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या निर्णयात गती आणू शकतात असं, सदानंद धुमे यांनी म्हटलं आहे.