अरूण जेटलींची गुगली; पीएफ काढताना लागणार टॅक्स
सर्व नोकरदारांसाठी तसेच निवृत्त होणाऱ्या किंवा ज्यांची निवृत्तीची रक्कम मार्च महिन्यानंतर येणार आहे, अशा सर्व नोकरदारांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
नवी दिल्ली : सर्व नोकरदारांसाठी तसेच निवृत्त होणाऱ्या किंवा ज्यांची निवृत्तीची रक्कम मार्च महिन्यानंतर येणार आहे, अशा सर्व नोकरदारांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
कारण पीएफची रक्कम या आधी टॅक्स फ्री होती, पण आता ही रक्कम टॅक्स फ्री राहिलेली नाही. यातील ६० टक्के रकमेवर आता टॅक्स लागणार आहे.
१ एप्रिल २०१६ नंतर पीएफच्या एकूण ६० टक्के रकमेवर टॅक्स लागणार आहे.
जर कर्मचाऱ्याचं मासिक वेतन १५ हजार रूपये, किंवा त्या पेठक्षा कमी असेल, तर त्यावर ही अट लागू होत नाही.
पीएफची वार्षिक मर्यादा दीड लाख रूपयांपर्यंत करण्यात आली आहे, तसेच १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा ८.३३ टक्के वाटा सरकार पीएफमध्ये देणार आहे.
नोकरी लागल्यानंतर पहिल्या तीन वर्षासाठी ही सेवा असेल. यासाठी १५ हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी २०१६ च्या बजेटमध्ये १ हजार कोटी रूपये ठेवण्यात आले आहेत.