ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची धुलाई
ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये ट्रेनमध्ये एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रेल्वे प्रवाशांनी त्याची चांगलीच धुलाई केली. हॉलिडे एक्सप्रेसच्या जनरल कोचमध्ये आपल्या मूक-बधिर भावासोबत प्रवास करणाऱ्या १६ वर्षाच्या मुलीवर ट्रेनमध्ये एका वेंडरने दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला.
हे प्रकरण मध्यप्रदेशातील इटारसी येथील आहे. वेंडरने मुलीला शौचालयात बंद करुन तिच्यावर दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या भाऊ ओरडल्यानंतर प्रवाशांनी शौचालयाचा दरवाजा उघडून त्या व्यक्तीची धुलाई केली. या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ