नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधतांना युवकांना तीन विशेष गोष्टी करण्यास सांगितलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये ३ नवे प्रयत्न करण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. नव्या जागी जा.
२. नवं ज्ञान घ्या.
३. नवे प्रयोग करा.


फुलबॉल किंवा हॉलीबॉल घेऊन गरीबांमध्ये जाऊन खेळा. यातून तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि ही गोष्ट तुम्हाला काहीतरी शिकवेल.


नेहमी रिजरवेशनने प्रवास करणाऱ्यांनी कधीतरी सामान्य डब्यातून प्रवास करा आणि लोकांकडून अनुभव घ्या.


नवं स्किल शिकण्याचा प्रयत्न करा. काहीतरी करण्याचं स्वप्न असणं चांगली गोष्टी आहे पण मानवी गुणापासून आपण दूर तर नाही जात आहोत ना ? हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.


नवी भाषा शिका. स्विमिंग शिका, चित्र काढा, कार शिका, कधीतरी ३ चाकांची सायकल चालवून बघा. आऊट ऑफ बॉक्स विचार करा. जे तुम्हाला नाही माहित ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा.


जगाला पाहून जे शिकायला मिळतं त्याची कल्पना आपण नाही करु शकत. जिज्ञासा ठेवा. एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तेथील अनुभव घ्या. तुम्ही काय नवीन केलं ते माझ्यासोबत शेअर करा. एखाद्या ठिकाणी गेले तर त्याच्या फोटो शेअर करा. #increadableIndia सोबत त्याला शेअर करा.


भीम अॅप जर तुम्ही कोणाला शिकवलं आणि ते जर त्याने वापरलं तर तुम्हाला प्रत्येकी १० रुपये सरकारकडून मिळतील. सुट्ट्यांच्या दिवसात हे काम करा.