नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डिजीटल पेमेंट लकी ड्रॉ काढताना विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी डिजीटल पेमेंट वाढविण्यासाठी भीम अॅपचेही लॉन्चिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 



यावेळी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- आजपण देशात सोने की चिडिया बनण्याची शक्ती आहे - मोदी 


- चिंदबरम यांच्यावर निशाणा साधत मोदी म्हणाले, विरोधी म्हणतात खोदा पहाड निकली चुहिया, पण मला ही चुहियाच काढायची होती. शेतकरी मेहनत करतात आणि ही चुहियाच खाऊन जाते. 


- असा एक काळ होता जेव्हा घोटाळ्यात इतके पैसे गेले अशी चर्चा होती. आता असा काळ आला आहे की किती पैसे जमा झाले अशी चर्चा होते. 


- भीम अॅपच्या माध्यमातून २०१७ ची भेट देत आहे 


- आज भारत बदलासोबत चालण्यास तयार आहे. 


- निराशावादी लोकांसाठी माझ्याकडे कोणता इलाज  नााही. आशावादी लोकांसाठी भरभरून देण्यासाठीआहे. 


- शेअरबाजार सुरूवातीला बोलीवर चालत होतं. पण आता अब्जावधींचा व्यवहार डिजीटल झाला आहे. 


- भीम अॅप गरीब, व्यापारी, शेतकरी आणि वंचितांना लाभ देणारे आहे. 


- आता तो दिवस दूर नाही की सर्व लोक भीम अॅपने देवाण घेवाण करतील 


- लवकरच अशी व्यवस्था आणणार की तुम्ही तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने पेमेंट करू शकणार. 


- तुमचा अंगठा तुमचा व्यवसाय आणि तुमची ओळख होईल


- डिजीटल देवाण-घेवाणीसाठी आता इंटरनेटची गरज नाही 


- १०० दिवसात ३४० कोटीची बक्षीस देण्यात 


-डिजी धन योजनेचा बंपर ड्रॉ १४ एप्रिल २०१७ रोजी आंबेडकर जयंतीला