नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या खासदार आणि मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाळा घेतलीय. मोदींच्या 7 लोककल्याण मार्गावरच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या योजना खासदारांनाच माहिती नसतील तर त्या लोकांपर्यंत कशा पोहचतील असा सवाल मोदींनी या खासदारांना विचारलाय. खासदारांनी या योजनांची माहिती घेऊन लोकांना द्यावी आणि कामात सुधारणा करावी असा सल्ला पंतप्रधानांनी दिलाय. 


2019 निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचनाही मोदींनी या खासदारांना केल्यात. अर्थसंकल्प आणि जाहीरनाम्यामधील आश्वासनं पूर्ण करण्याचा सल्लाही मोदींनी दिलाय. याशिवाय धनगर समाजाला एसटी समाजात आरक्षण देण्यासही मोदींनी नकार दिलाय. तर वेगळ्या ओबीसी मंत्रालयाची गरज नसल्याचेही पंतप्रधानांनी या बैठकीत स्पष्ट केलंय. नक्षलवाद कमी करण्यासाठी सरकारने खूप काम केल्याचंही मोदींनी म्हटलंय.