बंगळुरु : अण्णा द्रमुक पक्षाच्या सरचिटणीस शशिकला नटराजन शरण येण्यासाठी बंगळुरु जेलकडे रवाना झाल्यात. तत्पुर्वी मरीना बीचवर जयललिता यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतलं. याशिवाय टी. नगर इथं त्यांनी एमजीआर मेमोरियल हाऊसमध्ये दर्शन घेतलं. शशिकला यांनी जयललितांच्या समाधीवर तीन वेळा हात मारला. त्यानंतर त्यांनी असं का केलं असा प्रश्न अनेकांना पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयानं शशिकला यांनी शरणगतीसाठीची मुदत वाढवण्यासाठी केलेली याचिका फेटाळून लावलीय. त्यामुळे त्यांना तातडीनं शरण येण्याशिवाय आता पर्याय उरला नाही.  शशिकला नटराजन यांना ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं 4 वर्षांची शिक्षा सुनावली. तसंच 100 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय. शशिकलांसह अन्य दोन आरोपींना सुप्रीम कोर्टानं दोषी मानलंय. दुसरीकडे जेलकडे रवाना होण्याआधी शशिकला यांनी पक्षाची सूत्रं आपल्याच हाती राहतील याची खबरदारी घेतली आहे.


शशिकला यांनी दिनकरन आणि व्यंकटेश यांना 2011 मध्ये जयललिता यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यांची शशिकला यांनी घरवापसी केली आहे. या दोघांचीही त्यांनी सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. दरम्यान मंगळवारी शशिकलांनी अण्णा द्रमुकच्या विधानसभा नेतेपदी पलानीस्वामी यांची नियुक्ती केली. त्यानंतर पलानीस्वामींनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. तिकडे संध्याकाळी पन्नीर सेल्वम यांनीही राज्यपालांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्याची विनंती केली.


पाहा व्हिडिओ