नवी दिल्ली : न्यायमूर्ती कर्नन आणि सरन्यायाधीश जे एस केहर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. कर्नन यांना आज सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. याशिवाय कर्नन यांना तात्काळ अटक करून तुरुंगात टाकण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नन यांनी काल अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे एस केहर यांच्यासह आठ न्यायमूर्तींना पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा केलीय. त्यानंतर त्याला उत्तर म्हणून आज सर्वोच्च न्यायालयानं न्या. कर्नन यांना तात्काळ तुरुंगात टाकण्याची निर्देश दिलेत.


कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. ए. कर्नन यांना अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरविलेय. त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. काल कर्नन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांना प्रत्येकी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.दरम्यान, पदावर असताना तुरुंगवासाची शिक्षा झालेला कर्नन उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत. 


सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश केहर आणि अन्य न्यायाधीशांनी न्यायालयीन अवमानाची कारवाई सुरु करून आणि माझी वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश देऊन माझा छळ केला. त्यामुळे मी त्यांना दलित अत्याचर प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून प्रत्येकी पाच वर्षे कैद आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावत आहे, असा आदेश न्या. कर्नन यांनी आपल्या निवासस्थानी न्यायालय भरवून दिला होता.