लखनऊ : ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने ट्रिपल तलाक बंदीचे समर्थन केलंय. इतकंच नाहीतर ट्रिपल तलाकविरोधातला कायदा करण्याची मागणीही शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊमध्ये बुधवारी ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत ट्रिपल तलाकबाबत महिलांच्या अधिकारासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची शिफारस करण्यात आलीय. 


ट्रिपल तलाक बंदीमुळे हजारो महिलांचं आयुष्य उद्धवस्त होण्यापासून वाचेल. त्यामुळे ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी देशात कायदा बनवण्याची मागणीही ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने केलीय. तसंच गोवंश हत्याबंदीचंही बोर्डाने या बैठकीत समर्थन केलंय.