लखनऊ: पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांचा रविवारी कार्यक्रम होणार आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण गुलाम अलींच्या या कार्यक्रमाला शिवसेनेनं विरोध केला आहे. हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशाराही शिवसेनेनं दिली आहे. तसंच निदर्शन करणार असल्याचंही शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. एककीकडे पाकिस्तानमुळे भारतीय जवान शहीद होत असताना उत्तर प्रदेश सरकार असे कार्यक्रम घेत असल्याचं शिवसेनेनं म्हंटलं आहे.


 


शिवसेनेनं दिलेल्या या इशाऱ्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस खडबडून जागे झाले आहेत. पोलिसांनी शिवसेनेचे उत्तर प्रदेशातील नेते अनिल सिंग यांना घरात कैद करुन ठेवलं आहे.