सिमल्यात बर्फवृष्टी, डलहौजीत तापमान उणे तीन अंश
ऐन फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत.
सिमला : ऐन फेब्रुवारीमध्येही सिमल्यात बर्फवृष्टी सुरू आहे. सगळे रस्ते बर्फानं वेढले गेलेत.
सध्या सिमल्यातलं तापमान २ ते ३ अंशांपर्यंत खाली आलंय. डलहौजी आणि केलांगमध्ये तर उणे तीन अंशांपर्यंत तापमान खाली घसरलंय. बर्फवृष्टीमुळे स्थानिक शेतक-यांना आनंद झालाय.
सिमल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती होते. बर्फवृष्टी झाल्यामुळे तिथली जमीन मऊ होते. आणि त्यामुळेच पिकांची वाढही चांगली होते. पण या बर्फवृष्टीमुळे काही पर्यटक अडचणीत सापडलेत. अनेक बसेस आणि वाहनं रस्त्यांमध्येच अडकून पडलीयत.