श्रीनगर : जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आघाडीवर आहेत.त्यांच्या विरोधात पीडीपीचे उमेदवार नाझीर खान आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११.३० वाजता १० वाजता हाती आलेल्या वृत्तानंतर  नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुला यांना २४,१११ तर त्याचे प्रतिस्पर्धी पीडीपीचे नेते नाझीर अहमद खान यांना १८,५८२ मते पडली आहेत.


१० वाजता हाती आलेल्या वृत्तानंतर  नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुला यांना ८,२५१ तर त्याचे प्रतिस्पर्धी पीडीपीचे नेते नाझीर अहमद खान यांना ६,४१२ मते पडली आहेत.


याठिकाणी नऊ एप्रिलला मतदान घेतलं गेलं होते. मात्र त्यावेळी बडगाव जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावर हिंसाचार झाला होता. मतदान केंद्रावर हल्ला करणा-या गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात सहा जणांचा मृत्यू झाला होता.


या पोटनिवडणुकीत अवघं ७ पॉईंट १३ टक्के इतकंच मतदान झालं होतं. या ठिकाणी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.