नवी दिल्ली : देशात महाशिवरात्री उत्सावादरम्यान सोमनाथ मंदिरासह अनेक मंदिरांवर हल्ला करण्याचा कट सुरक्षा रक्षकांनी उधळून लावलाय. पाकिस्तानच्या १० पैकी ३ दहशतवाद्यांचा भारतात प्रवेश करताना गुजरात सिमेबाहेर खात्मा करण्यात आला, अशी माहिती आज उघड झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, १० संशयित लश्कर ए तैय्यबाचे (एलईटी) आणि जैश ए मोहम्मद (जेईएम)चे अतिरेक्यांना शोधून काढण्यात आले. यातील तीन अतिरेक्यांना ठार करण्यात यश आले आहे. असे वृत्त सीएनएन आयबीएनने दिलेय.


देशातील महत्वाची धार्मिक स्थळांपैकी सोमनाथ मंदिर, द्वारका मंदिर, अक्षरधाम मंदिर, विद्युत ठिकाणे, सरदार सरोवर धरण आणि सुरक्षा ठिकाणांच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. भारतात दहशतवादी घुसल्याची माहिती देण्यात आली होती.


गुजरात आणि देशाची राजधानी नवी दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या शहरातील मुख्य ठिकाणी आणि गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांचे टार्गेट होते, अशी माहिती आता पुढे येत आहे.