पर्रिकरांआधीही हे मंत्री शपथ घेताना चुकले होते
मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली.
पणजी : मनोहर पर्रिकर हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर गडकरींनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा शपथ घेतली.
यावेळी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी तात्काळ व्यासपीठाजवळ जावून पर्रिकरांना आपली चूक लक्षात आणून दिली. मग पर्रिकर यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
याआधीही मंत्रीपदाची शपथ घेताना काही नेते चुकले होते. मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रीपदाची शपथ घेताना आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे स्वत:चं नाव घ्यायलाच विसरले. ही चूक लक्षात आल्यावर राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी त्यांना नाव घ्यायला सांगितलं.
लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादवही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना चुकले होते. मंत्रिपदाची शपथ घेताना तेजप्रताप यादव यांनी 'अपेक्षित' या शब्दाचा उच्चार उपेक्षित असा केला होता.
शपथ घेतानाचा आर.आर.पाटील यांचा किस्साही प्रसिद्ध आहे. आर.आर.पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा ते घाबरले होते. मंत्रीपदाची शपथ घेताना त्यांचा आवाज कापत होता.