आश्चर्य! या रेल्वे स्टेशनला नावच नाही
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, ज्याला चक्क नावच नाही.
कोलकाता : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की भारतात एक असे रेल्वे स्टेशन आहे, ज्याला चक्क नावच नाही.
कुठे आहे हे स्टेशन
पश्चिम बंगालमध्ये एक असे रेल्वे स्थानक आहे, ज्याला गेली ८ वर्षे नावच नाही. पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील लोकांनी या स्थानकाला नाव देण्यासाठी अनेकदा मागण्या केल्या मात्र अजूनपर्यंत यावर निर्णय घेण्यात आला नाही.
या स्थानकाचे नाव आधी रैनागड असे ठेवणार होते. मात्र स्थानकाचे ठिकाण हे रैनागडपासून २०० मी पूढे नेण्यात आले त्यामुळे रैनागड हे नाव रद्द करून तिथे जवळ असलेल्या रैना या गावावरून नाव ठेवण्यात येणार होते. परंतु आतापर्यंत या स्थानकाच्या नावाचा वाद सुरू आहे.