बस्तर : छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आहे. भाजप जरी विकासाचे दावे करत असले तरी, छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यात वेगळंच चित्र आहे. येथे लोकांना ३ किलोमीटर जाण्यासाठी २५ ते ३० किलोमीटर फिरून जावं लागत होतं. गावकऱ्यांनी अनेकदा येथे ३ किलोमीटरचा रस्ता बनवण्याची मागणी केली पण त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.


गावकऱ्यांनी मग स्वत:चं येथून रस्ता बनवण्याचं काम हाती घेतलं. डोंगराच्या बाजूने हा रस्ता तयार केला जात आहे. येखील आमदार देखील गावकऱ्यांना यासाठी मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. डोंगराच्या बाजूने रस्ता बनवण्याचं काम गावकऱ्यांनीच पूर्ण करायला घेतलं आहे.