नवी दिल्ली : महाराष्ट्रामधून भाजपकडून राज्यसभेवर विनय सहस्त्रबुद्धे, डॉक्टर विकास महात्मे आणि पियुष गोयल राज्यसभेवर जाणार आहेत. पियुष गोयल यांचं नाव भाजपनं आधीच जाहीर केलं होतं, पण इतर दोन नावांची घोषणा केली नव्हती. आता हा सस्पेन्स मिटला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात 11 जूनला निवडणुका होणार आहेत. काँग्रेसनं राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना उमेदवारी दिली आहे. 


राज्यसभेच्या जागेसाठी भाजपनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना आंध्र प्रदेशमधून उमेदवारी दिली आहे. तर एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा हरियाणामधून मंगळवारी राज्यसभेचा अर्ज भरणार आहेत. सुभाष चंद्रा यांना भाजप, इतर पक्ष आणि अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे.