`जीएसटी` लागू झाल्यामुळे काय होणार स्वस्त आणि काय होणार महाग?
गुड्स अँड सर्विस टॅक्स बिल राज्यसभेसमोर मांडण्यात येणार आहे. असं म्हटलं जातंय की जीएसटी बिलबाबत इतिहास घडणार आहे. कारण अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं जीएसटी बिल सगळ्यांच्या सहमतीने पास होणार आहे.
नवी दिल्ली : गुड्स अँड सर्विस टॅक्स बिल म्हणजेच जीएसटी संसदेमध्ये पास झालं आहे. एप्रिल 2017पासून हे जीएसटी लागू होईल असं बोललं जात आहे. जीएसटीमुळे कोणत्या कोणत्या वस्तूंवर याचा परिणाम होणार आहे ? कोणत्या गोष्टी महाग आणि स्वस्त होणार आहे ? GST पासून तुम्हाला काय मिळणार पाहा.
काय होणार स्वस्त
१. व्यवहारावर वॅट आणि सर्विस टॅक्स नाही : घर खरेदीवर किंवा इतर कोणत्याही वस्तूच्या खरेदीवर वॅट आणि सर्विस टॅक्स लागणार नाही. जीएसटी लागू झाल्यानंतर हे स्वस्त होऊ शकतं.
२. हॉटेलचं बिल होणार कमी : हॉटेलमध्ये तुम्हाला नुसतं तुम्ही जे खाता त्याचंच बिल नाही लागत तर त्यावर वॅट आणि ६ टक्के सर्विस टॅक्स देखील लागतं. जीएसटीनंतर फक्त एकच टॅक्स लागेल.
३. इलेक्ट्रॉनिक वस्तू : एयरकंडीशनर, माइक्रोवेव ओवन, फ्रिज, वॉशिंग मशीन या वस्तू स्वस्त होऊ शकतात. या वस्तूंवर आता 12.5% एक्साईज आणि 14.5% वॅट लागतो. जीएसटीनंतर यावर 18% टॅक्स लागेल.
४. इंडस्ट्री : सगळ्यात जास्त फायदे इंडस्ट्रीला होणार आहे. कारण जीएसटीनंतर त्यांना १८ टक्के टॅक्स नाही भरावा लागणार आहे. टॅक्स भरण्याची प्रकिया देखील यामुळे सोपी होणार आहे.
काय होणार महाग
१. चहा-कॉफी : डब्यात बंद असलेलं फूड १२ टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात. चहा-कॉफी यासारख्या गोष्टींवर सध्या ड्यूटी नाही लागत पण जीएसटीनंतर ते १२% महाग होऊ शकतात.
२. सर्विसेस : मोबाईल बिल, क्रेडिट कार्ड बिल आणि इतर सेवा महाग होणार आहेत. सध्या सर्विसेसवर 15% टॅक्स लागतो (14% सर्विस टैक्स, 0.5% स्वच्छ भारत सेस, 0.5% कृषि कल्याण सेस). पण जीएसटीनंतर यावर एकूण १८ टक्के टॅक्स लागणार आहे.
३. डिस्काउंट : आता डिस्काउंटच्या किंमतीवर टॅक्स लागतो पण जीएसटी लागू झाल्यानंचर एमआरपीवर टॅक्स लगणार आहे. कंपनी 10000 रुपयांच्या वस्तू जर तुम्हाला 5000 रुपयात देते तर त्यावर तुम्हाला 600 रुपए टॅक्स लगतो पण जीएसटी लागू झाल्यानंतर तुम्हाला 1200 रुपये टॅक्स लागणार आहे.
४. हिरे आणि दागिने : हिरे आणि दागिने आता महाग होणार आहेत. सध्या 3% ड्यूटी यावर लागते. रेडिमेड गारमेंटही महाग होऊ शकतात कारण सध्य़ा यांच्यावर 4-5% स्टेट वॅट लागतो पण आता जीएसटीमध्ये यावर १२ टक्के टॅक्स लागणार आहे.