`रोज एक कायदा रद्द करणार`
केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
अलाहाबाद : केंद्र सरकारने आजवर बाराशे कायदे रद्द केले असून आगामी काळात दररोज एक कायदा रद्द करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. अलाहाबाद उच्च न्यायालयाला दीडशे वर्ष पूर्ण झाली, यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका व्यासपीठावर आले. व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराचा आग्रह धरणा-या मोदींनी न्यायव्यवस्थेमध्येही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रह धरलाय.
न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढायला हवा अशी अपेक्षा मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे. तंत्रज्ञानामुळे वकीलाचं काम सोपं झालं असून कोर्टाची तारीख मोबाईल एसएमएसवरुन मिळावी असंही मोदींनी म्हटलंय.