डेहराडून : उत्तर प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर लखनऊपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या त्यांच्या मूळ गावी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्तापर्यंत कधी फारशा मीडियासमोर न आलेल्या पोडी जिल्ह्यात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे... आणि म्हणूनच त्यांना 'वाय दर्जाची' सुरक्षा देण्यात यावी, असं निवेदन जिल्हा पोलिसांनी राज्य सरकारला दिलंय. 


खरं तर योगी यांनी घेतलेले काही निर्णय अनेकांच्या पचनी पडलेले दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसोबत काही घातपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


याच शक्यतांचा विचार करून उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडांतील पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आहे. त्यांनी काल संध्याकाळीच कुटुंबियांना सुरक्षा पुरवली आहे.


आता राज्याचा मुख्यमंत्री, मग त्यांच्या कुटुंबियांची काळजी राज्य सरकारलाच घ्यावी लागेल ना!