नवी दिल्ली : पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानला सहाय्य करूनही दहशतवादाला चाप लागत नाही त्यामुळे भारताने आपली नाराजी व्यक्त केली आहे. ओबामा सरकारने पाकिस्तानला ७०० दशलक्ष डॉलर्स किमतीची ८ एफ- १६ ही फायटर विमानं विकण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेऊ नये असे अमेरिकेच्या रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असा दोन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सुचवूनही ओबामा सरकारने हा निर्णय घेतला आहे. 


पेंटागॉनच्या संबंधित विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून हा निर्णय अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाला अनुसरून असल्याचे म्हटले आहे. दक्षिण आशियामधला पाकिस्तान हा अमेरिकेचा धोरणात्मक भागीदार असून त्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.


भारताने मात्र या व्यवहारास विरोध केला असून नाराजी व्यक्त केली आहे.