COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॉस्को : राग माणसाला कुठल्याही थरावर घेऊन जातो, रशियात रशिअन एअरलाईन्स युटी एअरच्या एका कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आलं, त्याच्या रागात त्याने जेसीबीने विमानाची तोडफोड केली. 


यू-ट्यूबचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय, कोट्यवधी किंमत असलेलं हे विमान त्याने भंगारात दिल्यासारखं करून टाकलं. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर २४ एप्रिल रोजी टाकण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत ३ लाख हिट्स आहेत.


रशियात बऱ्याच वेळेस जुनी विमानं तोडून टाकतात, या त्याचाच भाग असल्याचं सांगून, एका न्यूज एजन्सीने हे संतापाच्या भरात झालेलं कृत्य नसल्याचं म्हटलं आहे.