बर्लिन : ख्रिसमस बाजारात ट्रक घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. तर ५० हून अधिक लोक जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा ट्रक जाणूनबूजून बाजारात घुसवला गेल्याचा संशय पोलिसांना आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर हा अतिरेकी हल्ला आहे का? याचा तपास आता पोलीस करत आहेत. 


एका संशयिताचा हा घटनेत मृत्यू झाला असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याचं जर्मन पोलिसांनी सांगितले.