वॉशिंग्टन : राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात, अशी इच्छा असल्याचे हिलरी क्लिंटन यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये २३ मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात २३ पैकी ७ महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना ही स्थिती बदलायची आहे. एका भारतीय मुक्त लेखिकेला दिलेल्या मुलाखतीत क्लिंटन यांनी ही इच्छा व्यक्त केली.


अमेरिकेत सध्या २४.५ टक्के लोकप्रतिनिधी आहेत. तर सिनेटर्सपैकी २० टक्के महिला आहेत.  अमेरिकेतल्या ६ राज्यांमध्ये महिला गव्हर्नर आहेत.  अमेरिकेतल्या १०० शहरांपैकी फक्त १९ शहरांमध्ये महापौरपदी महिला विराजमान आहे. त्यामुळेच महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिकाधिक स्थान देण्याचा हिलरी क्लिंटन यांचा मानस आहे.