हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन
हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले.
लॉस अॅंजेलिस : हॉलिवूड अभिनेत्री कॅरी फिशर यांचे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारपासूनच कॅरी फिशर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फिशर यांच्या जाण्याने हॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 'स्टार वॉर्स' चित्रपटातील 'प्रिन्सेस लेया' ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती.
कॅरी फिशर यांचे मंगळवारी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी लॉस अॅंजेलिस येथे निधन झाले. १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटातील प्रिन्सेस लेया म्हणून नावारुपास आलेल्या कॅरी फिशर आल्या होत्या
१९७५ मध्ये अभिनेता वॉरन बिटीसोबतच्या ‘शॅम्पू’ या चित्रपटाद्वारे फिशर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. या सुपरहिट चित्रपटामागोमाग कॅरी फिशर यांनी ‘ऑस्टिन पॉवर्स’, ‘द ब्लूस ब्रदर्स’, ‘चार्लिज एन्जेल्स’, ‘हॅना अॅण्ड हर सिस्टर्स’, ‘स्क्रिम ३’ आणि ‘व्हेन हॅरी मेट सॅली’ या आणि यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.