बोगोटा : कोलंबियातल्या मोक्का शहरात झालेल्या भूस्खलनात तब्बल 254 जणांचा बळी गेलाय. त्यामध्ये 43 लहान मुलांचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या राष्ट्राध्यक्ष ज्युवान मॅन्युल सांटोस यांनी दिलेल्या  माहितीनुसार दुर्घटनेतील मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  


भूस्खलनाच्या तडाख्यात सुमारे 40 हजार लोकांची घरं जमीनदोस्त झाली आहेत. गेल्या पाच दशकांपासून कोलंबियामध्ये गृहयुद्धानं लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. गेल्या तीन वर्षात या गृहयुद्ध थांबवून चर्चेनं राजकीय तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झालेत. 


सध्याचे राष्ट्रपती ज्युवान मॅन्युल सांटोस यांना त्यासाठी यंदाचा नोबेल शांती पुरस्कारही देण्यात आला. पण देशात गेल्या पन्नास वर्षात दारिद्रानं परिसीमा गाठलीय.  यापार्श्वभूमीवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सरकारविरोधी क्रांतीकारी गटातले जवानही मदतीसाठी उभे ठाकले आहेत.  दरम्यान कोलंबियात झालेल्या या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांसाठी प्रार्थना करत असल्याचं ख्रिश्चन धर्मियांचे आद्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी म्हटलंय.