दुबई : दुबईतील जगप्रसिद्ध उंच आणि वैशिष्टपूर्ण इमारत बुर्ज खलिफा तिरंग्यानं उजळून निघाली. तिरंगाच्या रंगामध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आलीये. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केशरी, पांढरा आणि हिरव्या रंग आणि अशोकचक्र अशा तिरंग्यातील रोषणाई सर्वांचंच लक्ष वेधून घेतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचं नवी दिल्लीत विमानतळावर स्वागत केलं.


प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय सैन्याबरोबर संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे जवान देखील परेडमध्ये सहभाग घेणार आहेत. त्यांचे 144 जवान आणि 35 बँण्ड पथकातील जवान परेडमध्ये सहभागी होणार आहेत.  फ्रान्स नंतर युएई दुसरा देश आहे जो राजपथावरील परेडमध्ये सहभागी होतोय. 2016 मध्ये फ्रान्सचं पथक परेडमध्ये सहभागी झालं होतं.