मुंबई : युरोप आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळावरच्या मिथेन वायूचा शोध घेण्यासाठी आज एक उपग्रह सोडण्यात येणार आहे. या साडे दहा फुटी ट्रेस गॅस ऑरबिटरेटर अर्थात TGO नावाच्या उपग्रहामुळे मंगळावरच्या जीवसृष्टीचाही वेध घेता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचं मंगलयान मोहिमेला दोन वर्ष होत असतांना प्रमुख्यानं रशियाची मोहीम आजपासून सुरू होणार आहे. याआधी रशियानं तब्बल 21 वेळा मंगळाच्या अभ्यासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याला पाहिजे तसं यश आलेलं नाही. त्यामुळे आज लॉन्च होणाऱ्या टीजीओकडे साऱ्या जगाचं लक्ष्य आहे. 


विशेष म्हणजे आज ज्या यानाच्या सहाय्यानं TGO उपग्रह सोडला जाणार आहे, त्याचाच उपयोग करून युरोपियन स्पेस एजन्सी 2018 मध्ये मार्स रोव्हर मंगळावर उतरवणार आहे. त्यामुळे आज जर उपग्रह व्यवस्थित प्रक्षेपित झाला, तर तंत्रज्ञानालाही पुष्टी मिळेल.