ब्रिटन : ब्रिटिश सरकारच्या नव्या व्हिजा नीतीमुळे हजारो भारतीयांना समस्येला तोंड द्यायला लागू शकतं. यामुळेच, ब्रिटनमध्ये स्थायिक भारतीयांनी या नव्या नीतीवर पुन्हा एकदा सरकारनं विचार करावा, अशी मागणी केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

६ एप्रिलपासून संपूर्ण ब्रिटनमध्ये ही व्हिजा नीती लागू होणार आहे. टियर-२ वीजाच्या नव्या नियमांनुसार, ३५ हजार पाऊंड (जवळपास ३३ लाख रुपये) हून कमी वार्षिक कमाई करणाऱ्या व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला व्हिजाचा कालावधी संपल्यानंतर आपल्या देशात परतावं लागणार आहे.  


आत्तापर्यंत ही सीमा २१ हजार पाऊंड (जवळपास १९ लाख ८४ हजार रुपये) होती. नव्या नियमांनुसार, युरोपियन युनियन (ईयू) च्या सदस्या देकांची नागरिकता स्वीकारणाऱ्या व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाला मात्र यातून सूट देण्यात येईल. 


याविरुद्ध अनेक भारतीयांनी 'स्टॉप३५थाऊसंड' नावाची एक कॅम्पेन सुरू केलीय. नियमांमध्ये बदलाव हा गैर-ईयू नागरिकांसोबत भेदभाव, असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.