नवी दिल्ली :  उरीत झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याचे परिणाम पाकिस्तानला भोगावे लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्क संमेलनात भाग न घेण्याच्या निर्णयानंतर भूतान, बांगलादश आणि अफगाणिस्तान यांनीही संमेलनात भाग न घेण्याचे ठरवले. 


तसेच अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या हद्दीत राहण्यास सांगून चांगले फटकारले तर चीननेही काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची साथ देण्यास नकार दिला. 


का म्हटली अमेरिका....


अमेरिकाने भारत आणि पाकिस्तान यांना सांगितले की, त्यांनी हिंसेने नाही तर कूटनितीतून आपसातील मतभेद दूर केले पाहिजे. पाकिस्तानने आपल्या हद्दीचे भान राखले पाहिजे, असे अमेरिकेतर्फे व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले.