सेऊल : NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.


भारताच्या सदस्यत्वाला जगभरातल्या देशांकडून पाठिंबा मिळतोय, अशा परिस्थितीत या मोहिमेत चीननंही सहभागी व्हावं अशी सूचक अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. एनएसजीमध्ये भारतास सदस्यत्व देण्यास चीननं विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेली ही चर्चा अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. दुसरीकडे पाकिस्ताननं मात्र चीनचे कान भरलेत. NSGमध्ये भारताला सदस्यत्व देतांना नियमाला बगल दिल्यास त्याचा उपखंडातल्या शांततवेर परिणाम होईल, असं पाकिस्तानचं म्हणणं आहे.