ब्रिक्स परिषदेत भारत-चीनमध्ये दहशतवाद, NSGवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली.
बेनालिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यामध्ये ब्रिक्स परिषदेत दहशतवाद आणि NSG च्या मुद्द्यावर चर्चा झाली. मोदी आणि जिनपिंग यांच्यामधली ही चर्चा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली आहे.
कोणताच देश दहशतवादापासून वाचू शकत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी भारत आणि चीनला एकत्र यावं लागेल असं मोदी जिंगपिंगना म्हणाल्याची प्रतिक्रियाही स्वरुप यांनी दिली आहे.