प्योंगयांग :  उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याच्या क्रुरतेच्या आणि निर्दयीपणाच्या अनेक काहण्या ऐकण्यात आल्या आहेत. त्या आता एका नव्या काहणीची त्याला जोड मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उत्तर कोरियात एखाद्या मीटिंगमध्‍ये डुलकी घेणे आणि हुकुमशहा किम जोंग ऊनला अनावश्यक सल्ला देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे.


 किम जोंगने एक मोठा अधिकारी आणि माजी कृषीमंत्री या दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. अँटी एअरक्राफ्ट गनने या दोघांना ठार मारण्यात आले. किम जोंग एका मीटिंगमध्‍ये​ भाषण देत होता.
 
यावेळी शिक्षण विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी री योंग जिन त्यांना डुलकी घेताना दिसले. त्यांनी ताबडतोब री यांना अटक करण्‍याचे आदेश दिले. 


 री यांना अटक करुन चौकशी करण्‍यात आली. किम जोंग यांचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आरोप सिद्ध झाल्याने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. 


 दुसरीकडे माजी कृषी मंत्री ह्योंग मिन देशात कृषी उत्पादन वाढवण्‍यासाठी रोज नवे विचार आणि कल्पना मांडत होते. किम जोंग ऊन यांना हे खूप जिव्हारी लागले. हा माझा कमीपणा दाखवण्‍याचा प्रकार असल्याची समजून करून घेऊन किम जोंग यांनी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. 


या शिक्षेची अंमलबजावणी अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. या दोघांना प्योंगयांगच्या लष्‍करी अकादमीमध्‍ये अँटी एअरक्राफ्ट गनने उडवण्यात आले.